निवासी भाडेकरूंबाबतचे स्थानिक कायदे राज्याच्या कायद्यांपेक्षा वेगळे असू शकतात. दीर्घकालीन रिझरव्हेशन स्वीकारण्यापूर्वी तुम्ही तुमच्या स्थानिक नियम आणि कायद्यांचा आढावा घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो.
अमेरिकेतील बहुतेक राज्यांमध्ये आणि परिसरांमध्ये, एखाद्या घरात किंवा अपार्टमेंटमध्ये एक महिना किंवा त्याहून जास्त राहणाऱ्या गेस्ट्सना—दिवसांची नेमकी संख्या न्यायक्षेत्रांनुसार बदलू शकते—भाडेकरू म्हणून अधिकार प्राप्त होऊ शकतात. सर्वसाधारणपणे, याचा अर्थ असा की स्थानिक भाडेकरार कायदे गेस्ट्सचे संरक्षण करू शकतात आणि तुम्ही त्यांना तुमच्या प्रॉपर्टीमधून न्यालयाच्या माध्यमातून आवश्यक त्या निष्कासन प्रोसेसशिवाय काढू शकणार नाही.
उदाहरणार्थ, कॅलिफोर्निया, इलिनॉय आणि न्यूयॉर्कमध्ये, सलग 30 दिवसांच्या ऑक्युपन्सीनंतर गेस्ट्सना भाडेकरू मानले जाऊ शकते. तुमच्यासोबत 30 दिवसांपेक्षा कमी काळ वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीला सामान्यतः त्या अर्थाचा लिखित करार असल्याशिवाय भाडेकरूचा हक्क नसतो, पण प्रत्येक राज्यात याबद्दलचे नियम वेगवेगळे असू शकतात.
अशा परिस्थिती खूपच दुर्मीळ असतात, पण तसे घडल्यास, आम्ही तुमच्यासोबत काम करू आणि तुमच्या गेस्टसह समस्येचे निराकरण करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला अशा परिस्थितीचा सामना करावा लागल्यास, आमच्या 24/7 सहाय्यक टीमला शक्य तितक्या लवकर कळवा आणि आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.
तुम्ही तुमचे घर किंवा अपार्टमेंट मासिक वास्तव्यासाठी भाड्याने दिल्यास, गेस्ट्सनी भाडेकरारावर सही करावी असे तुम्हाला वाटते का यावर विचार करा. तसे असल्यास, बुकिंगला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी तुम्ही तुमच्या घराच्या नियमांमध्ये या आवश्यकता स्पष्ट केल्या पाहिजेत. तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून या विषयांचे नियमन करणारे कायदे खूप वेगवेगळे असतात, त्यामुळे तुमच्या स्थानिक कायद्यांशी आणि नियमांचा अभ्यास असलेल्या, घरमालक-भाडेकरू व्यवहारातील तज्ञ अशा वकिलाशी खात्रीने संपर्क करा.
भाडे नियंत्रण हा कायद्यांचा एक विशेष संच आहे, ज्यामध्ये भाडे वाढीवरील मर्यादा आणि निष्कासनावरील निर्बंधांचा समावेश असतो. काही स्थानिक भाडे नियंत्रण कायदे राज्याच्या कायद्याला ओव्हरराईड करू शकतात आणि अनेक राज्ये किंवा स्थानिक न्यायक्षेत्रांमध्ये भाडे नियंत्रण नसले तरी इतर कायदे भाडेकरूंचे संरक्षण करू शकतात. या कारणांमुळे, भाडे नियंत्रण आणि भाडे स्थिरीकरणाबद्दल आणि या नियमांचा मासिक वास्तव्यावर कसा परिणाम होऊ शकतो याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या स्थानिक रेंट बोर्ड, ग्राहक व्यवहार विभाग, अटर्नी जनरल किंवा इतर एजन्सींशी संपर्क साधावा अशी आम्ही शिफारस करतो.
जवळपास सर्व राज्यांमध्ये असे कायदे अस्तित्वात असतात ज्यांच्यानुसार घरमालक संक्षिप्त कार्यवाही वापरून भाडेकरूंना निष्कासित करू शकतात. संक्षिप्त कार्यवाही ही एक अशी न्यायालयीन कार्यवाही असते जिच्या मार्फत घरमालक भाडेपट्ट्याने दिलेल्या प्रॉपर्टीचा ताबा त्वरित परत मिळवू शकतात. तुम्ही जिथे राहता तिथल्या निष्कासनविषयक कायद्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही घरमालक-भाडेकरू व्यवहारांमधील वकिलाशी किंवा तुमच्या स्थानिक काउंटी कोर्टाशी संपर्क साधायला हवा, कारण मासिक वास्तव्यापेक्षा जास्त राहणाऱ्या गेस्टना निष्कासित करण्याच्या तुमच्या क्षमतेवर त्यांचा परिणाम होऊ शकतो.